संपूर्ण भारत कोरोना मुळे लॉकडाऊन असताना मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ने सांगितले प्रमाणे सर्व रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे रेशन रेशनींग दुकानात मिळेल..त्या आदेशाची अम्मलबजावणी खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत नावंढे हद्दितील नावंढे गावातील रेशनिंग दुकानदार मा.विशाल आगिवले यांनी या धान्याचे वाटप दि.3/3/2020 पासुन सुरु केले..गावात एकुण 392 कार्ड धारक असुन 389.च सिधापत्रिका धारकांना रेशनिंग उपलब्ध झाले..या गावात आदिवासी बहुल संखेने आहेत..सरकारच्या या धोरणाचे आदिवासी तसेच इतर लोक हि समाधानी असल्याचे चिन्ह दिसत आहेत..रेशनिंग वाटप वेवस्थित सुरु आहे हे तपासायला खालापूर तहसिल कार्यालयातील नायब निवासी तहसिलदार योगी मॕडम,नावंढे सजाचे तलाठी कवडे तात्या.तसेच ग्रुप ग्राम पंचायत चे ग्रामसेवक पवार तात्या तसेच सामर्थ्य जनशक्ति संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष गोपिनाथ सोनावणे उपस्थित होते..गावातील सगळे सिधाधारक हे समाधानी असुन कोणाची काहिही तक्रार नाही असे नावंढे ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक पवार साहेब व तलाठी कवडे तात्या यांनी सांगितले..व अन्य काही शासनाने काही उपलब्ध करुण दिले तर ते सर्वतोपरी जनतेपर्यंत पोहचेल असे रेशनिंग दुकानाचे मालक विशाल आगिवले यांनी सांगितले..
खालापूर तालुक्यातील नावंढे गावात रेशनिंग दुकानात 3 महिन्यांचे रेशनिंग वाटप.