पुणे : प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख, गरजु कुटुंबियांना जिलई जमियते अहले हदीस पुणे या संस्थेतर्फे धान्य वाटप.

पुणे : प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख, गरजु कुटुंबियांना जिलई जमियते अहले हदीस पुणे या संस्थेतर्फे धान्य वाटप...
कोरोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता देशात व राज्यात सुरु असलेल्या जमावबंदी,संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. 
याकारणास्तव जिलई जमियते अहले हदीस पुणे या संस्थेतर्फे गरिबांना धान्य वाटप करण्यात आले. दरवर्षी या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी निर्माण झालेली परिस्थिती जवळपास दोन महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना या विषाणूने मुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणामुळे या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये गहु, तांदूळ, अंडे, भाज्या व इतर वस्तूंचा वाटप केले आहे आणि तसेच पोलिसांना व पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाष्ट्याची व्यवस्था व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यामध्ये जवळपास एक हजार ते अकराशे परिवारांना या वस्तूंचा वाटप करण्यात आलेले आहे.
हे वस्तू वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष  नईम पटेल,अब्दुल राजीक, जावेद पवार, बिलाल पटेल, समीर इंजेरवाला, हाजी आसिफ शेख, असलम शेख, सलीम काझी, मतिउल्ला चौधरी, मोहम्मद जमादार व आदी मान्यवर उपस्थित होते.