वाशी पोलीस ठाणे मध्ये सॅनिटायझेशन कक्ष तयार करण्यात आले.

   वाशी पोलीस ठाणे मध्ये सॅनिटायझेशन कक्ष तयार करण्यात आले आहे. 


    कोरोना विषाणूंमुळे देशभर लॉकडाउन असला तरी पोलीस प्रशासन 24तास आपले कर्तव्यपार पाडत आहे, जनतेच्या हितासाठी दिवस-रात्र त्याचा जीव धोक्यात घालून जनतेचं संरक्षण करत आहे, पोलीस प्रशासनाचा सुरक्षिततेचे गांभीर्य लक्षात घेता, 
     वाशी पोलीस ठाणे येथे मा.पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांच्या संकल्पनेतुन एक सॅनीटायझेशन कक्ष तयार करण्यात आले आहे. सदर कक्षाचे उद्घाटन आज दिनांक 13/4/2020 रोजी 11.30 वा. मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1, नवी मुंबई श्री. पंकज डहाणे साहेब यांच्या हस्ते पार पडले.  
        सध्याच्या कोरोना व्हायरस अनुषंगाने अद्भवलेल्या    कठीण परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी हे 24×7 तास अहोरात्र कत॔क्य करत असल्याने ते एक्सपोज होत असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ते  सदर कक्षातून सॅनीटाईझ होऊन पोलीस ठाण्यात प्रवेश करणार असल्याने सुरक्षित राहणार,  तसेच पोलीस ठाण्यास भेट देणारे तक्रारदार नागरिक यांना देखिल त्याचा लाभ होणार आहे.