कोरोना विषाणूंमुळे होणार्या महामारीच्या विरूद्ध जग लढा देत आहे आणि लोकांना त्यांच्या घरांमध्ये बंदिस्त व्हावे लागले आहे, कित्येक कुटुंबांना रोजगार मिळण्याची संधी नसल्याने रोजचे जेवण देखील मिळविण्यासाठी ते धडपड करीत आहेत.
क्राइस्ट एम्बेसी चर्चने या परिस्थतीत आपला मदतीचा हात पुढे केला आणि मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील लोकमान्य नगर येथे 28 गरजू कुटुंबीयांना किराणा सामान वाटले. लॉकडाऊन कालावधीत गरजवंतांना त्यांचा किराणासाठा मिळाल्याने त्यांना अत्याधिक आनंद झाला. तसेच आणखी काही कुटूंबियांशी देखील संवाद साधून गरजेच्या वेळी मदत करण्याचे वचन दिले.
पोलिस अधिकारी, लोकमान्य नगर पोलीस स्टेशन यांचे सहकार्य मिळाले
आम्हाला प्रभु येशू ख्रिस्ताने प्रेम आणि दया करण्यास शिकविले ज्याने आम्हाला या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवृत्त केले, म्हणून आम्ही त्याचे मनापासून आभार मानतो.
आम्ही प्रार्थना करतो की सर्वशक्तिमान परमेश्वर जो त्यांचा स्रोत व दाता आहे त्याने इथून पुढे ही त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या आणि येशूच्या नावात, शांति आणि आनंदाने त्यांचे हृदय भरावे. अशी प्रार्थना देखील चर्च च्या सर्व लोकांनी केली.