वाशी पोलीस ठाणे मध्ये जे.जे हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीम ने केले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन.

वाशी पोलीस ठाणे मध्ये जे.जे हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीम ने केले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. 


   


        वाशी पोलीस ठाणे येथे मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि पोलिस उपायुक्त, मुख्यालय नवी मुंबई यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनुषंगाने स्ट्रेस मॅनेजमेंट, माॅरल बुस्टींग, ईमयुनीटी पाॅवर वाढविणे या विषयावर जे.जे.हॉस्पिटल यांच्या डॉक्टरांची टीम वाशी पोलीस ठाणे व वाशी टोल नाका येथे आली होती. त्यांनी पोलिस ठाण्याचे तसेच वाहतुक विभागाचे अधिकारीआणि कर्मचाऱ्यांना नमुद विषयावर फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. स्ट्रेस मॅनेजमेंट करुन दैनंदिन जीवनातील  आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवला जातो व त्या आधारे सध्याच्या संकटातून कसे बाहेर पडता येईल यावर देखील मार्गदर्शन केले. तसेच करोना संसर्ग कशा प्रकारे होऊ शकतो आणि  कोणत्याही प्रकारे न घाबरता कसे काम केले पाहिजे वगैरे विषयावर फार सुंदर मार्गदर्शन केले. 
       सदरच्या मार्गदर्शनामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना फार चांगल्या प्रकारे उपयोग होऊन ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. वाशी पोलिस ठाणे व टोल नाका येथील 10 अधिकारी व 60 कम॔चारी हजर होते.


       संजीव धुमाळ
वरिष्ठ पोलिस निरीक्षक 
वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई